| अलिबाग | वार्ताहर |
भारतरत्न, माजी राष्ट्रपती डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम यांची जयंती रायगडात वाचन प्रेरणा दिन म्हणून साजरी करण्यात आली.यानिमित्ताने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. चेंढरे येथील स्वामी समर्थ वाचनालयामध्ये वाचन प्रेरणा दिन आयोजित करण्यात आला होता.यावेळी प्रा.डॉ.श्रुती राजे यांनी डॉ.कलाम यांचे विचार आणि वाचनाचे महत्व विषद केले.शिवाय अपराजिता सीता या विषयावर व्याख्यानही दिले.यावेळी कलाम यांच्या प्रतिमेस पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले.ज्योती आमले यांनी आभार मानले.तर लता कुलकर्णी यांनी सुश्राव्य गायन सादर केले.या कार्यक्रमास अनुराधा गुळवणी,सौ.जोशी, दाते, भिडे, वर्षा दिवेकर, माधवी खराडे,आदी उपस्थित होते.ग्रंथपाल दीप्ती कुलकर्णी यांनी सूत्रसंचालन केले.
खांबेटे सार्वजनिक वाचनालय
केशवराव खांबेटे सार्वजनिक वाचनालय म्हसळा येथे वाचन प्रेरणा दिन म्हणून साजरा करण्यात आला. यावेळी अब्दुल कलाम, श्री सरस्वती देवी यांच्या प्रतिमेचे मान्यवरांचे हस्ते पूजन करण्यात आले. यावेळी सार्वजनिक वाचनालयाचे अध्यक्ष संजय खांबेटे, उपाध्यक्षा श्रीमती अर्पणा ओक, संचालक सुनिल उमरटकर,न्यू इंग्लीश स्कूलचे शिक्षक एस.ए.वसावे व्ही.के.कामडी , ग्रंथपाल उदय करडे, लिपीक सायली चोगले आणि मोठ्या संखेने न्यू इंग्लीश स्कूल म्हसळ्याचे विद्यार्थी / विद्यार्थीनी उपस्थित होते .
वाचनालयाने हॅपी थॉट,सरश्री चित माझे सुख आणि आरोग्य माझ्याच हाती याबाबत विचार नियम क्रांती आणि आरोग्याची गुरुकिल्ली ह्या पुस्तिका सर्व विद्यार्थी,विद्यार्थिनींनीकडून वाचून घेण्यात आल्या.