। नेरळ । प्रतिनिधी ।
नेरळ गावातील नेरळ सार्वजनिक माघी गणेशोत्सव मंडळाच्या लोकमान्य टिळेक वाचनालय येथील नेरळच्या राजाच्या दरबारात विद्या विकास मंदिर शाळेच्या विद्यार्थ्यांनी सामूहिक पद्धतीने अथर्वशीर्ष पठण करुन श्रीगणराया चरणी आपली सेवा समर्पित केली आहे.नेरळ गावाचा राजा म्हणून प्रसिद्धीला आलेल्या नेरळच्या राजाच्या दरबारात विद्या विकास शाळेच्या विद्यार्थ्यांनी श्रीगणेशाच्या ‘मुदाकरात् मोदकम्’ या स्तोत्राने केली. त्यानंतर सामूहिक रित्या अथर्वशीर्ष पठण करण्यात आले. तसेच, गणरायाच्या मंत्राचा जयघोष करण्यात आला. योवेळी, नेरळचा राजा मंडळाचे ज्येष्ठ सल्लागार मुलचंद शहा, मंडळाचे पदाधीकार आशुतोष गडकरी, विशाल साळुंखे, राहुल कालेकर, विशाल कालेकर, कुणाल मनवे, प्रथमेश देशमुख उपस्थित होते.