। पनवेल ग्रामीण । वार्ताहर ।
नवी मुबंई पोलीस आयुक्तालय हद्दीतील कळंबोली पोलीस ठाणे अंतर्गत येणार्या एका पोलीस निवारा केंद्राच्या काचा मानसिक रुग्ण असलेल्या एका व्यक्तीकडून फोडण्यात आल्या. ही घटना मंगळवारी (दि.4) रात्रीच्या सुमारास घडली आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी संबंधित व्यक्तीला ताब्यात घेतले असून, चौकशी अंती त्याच्या मानसिकतेची माहिती घेऊन त्याला सोडून देण्यात आले आहे. बेघर असलेली ही व्यक्ती मानसिक रुग्ण असून, रात्रीच्या सुमारास कळंबोली वसाहतीत सर्वत्र फिरत असल्याची माहिती देण्यात आली आहे.