रायगड जिल्ह्याला रेड अलर्ट

। रायगड । प्रतिनिधी ।

रायगड जिल्ह्याला आज हवामान विभागाचा मध्यम ते जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. सध्या आकाशात ढगाळ वातावरण बघायला मिळत आहे. येत्या 3 तासांत परिस्थिती आणखी बिकट होण्याची शक्यता आहे. रायगड जिल्ह्याला हवामान विभागाकडून रेड अलर्ट देण्यात आला आहे. दरम्यान, रत्नागिरी, साताऱ्यात घाट परिसरात, कोल्हापूर आणि पुण्यात ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. अशातच आज देखील पाऊस कोसळण्याची शक्यता वर्तविण्यात आल्यामुळे नागरिकांना सतर्क राहण्याच्या जिल्हा प्रशासनाच्या सूचना आहेत.

Exit mobile version