कोलेटी ग्रामपंचायतीत शेकापच्या रीना जोशी विजयी

| पाली | वार्ताहर |
कोलेटी प्रभाग क्र. 2 दोन मधून येथील शेतकरी कामगार पक्षाचे कट्टर समर्थक जितेंद्र जोशी यांच्या पत्नी रीना जितेंद्र जोशी या भारगोस मतांनी निवडून आल्या. रीना जोशी यांनी या अगोदर कोलेटी ग्रामपंचायतीच्या सरपंच पदाची धुरा पारदर्शकपणे पार पाडली त्यांच्या कारकिर्दीत त्यांनी ग्रामपंचायत हद्दीतील अनेक विकास कामे करून मतदारांची मने जिंकली होती त्याचाच फायदा त्यांना या निवडणुकीत झाला. जोशी यांना 158 मते मिळाली तर त्यांच्या प्रतिस्पर्धी उमेदवार विद्या ठाकूर यांना 104 मते मिळाली. यात रीना जोशी या 54 मताने विजयी झाल्या. गावातील कार्यकर्ते वसंतशेठ भोईर काशिनाथ तांबोळी , कृष्णा डाकी आदिसह गावातील नागरिकांनी त्यांना शुभेच्छा दिल्या. तसेच रीना जोशी व त्याचे पती सामाजिक कार्यकर्ते जितेंद्र जोशी यांनी सर्व मतदार बंधू आणि भगिनींचे आभार मानले.

Exit mobile version