प्रादेशिक परिवहन विभागाच्या अधिकाऱ्यांचे रिक्षा चालकांना आवाहन

बिना पावती कोणतीही रक्कम भरू नका

| पनवेल | विशेष प्रतिनिधी |

प्रादेशिक परिवहन विभागाकडून बिना पावती कोणतीही रक्कम स्वीकारली जात नाही. जर असा कोणताही प्रकार रिक्षा चालकंच्या निदर्शनास येत असेल तर या बाबतची तक्रार रिक्षा चालकांनी करावी. प्रादेशिक परिवहन विभागाकडून या विरोधात कारवाई करण्यात येईल. त्याचप्रमाणे दंड आकरण्यासाठी कोणत्याही खाजगी कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्यात आलेली नसल्याचे पनवेल उप प्रादेशिक अधिकारी अभय देशपांडे यांनी सांगितले.

Exit mobile version