पिकांची नोंद इ-पीक पाहणी अ‍ॅपद्वारे करा

| मुरूड जंजिरा | वार्ताहर |
शासनाच्या आदेशानुसार मुरुड तालुक्यातील शेतकरी बांधवांनी इ पीक पाहणी अ‍ॅपद्वारे आपल्या शेतातील पिकांची नोंद आपण स्वतः शेतात जाऊन करण्याचे आवाहन मुरुड तालुक्याचे नायब तहसीलदार रवींद्र संपतराव सानप यांनी केले आहे. तशी नोंद शेतकर्‍यांनी न केल्यास त्यांच्या सातबारामधील पीकपेरा कोरा राहून कोणत्याही प्रकारची शासकीय मदत, पीक विमा, पीक कर्ज, अथवा अनुदान प्राप्त होणार नाही. तरी याची त्वरित दखल घ्यावी. तसेच सदरची माहिती तालुक्यातील प्रत्येक ग्रामपंचायतीने घेऊन गावोगावी दवंडी पिकवून शेतकर्‍यांना द्यावी, असेही सानप यांनी म्हटले आहे.

Exit mobile version