तळा पंचायत समिती गणांचे आरक्षण सोडत जाहीर

। तळा । प्रतिनिधी ।
तळा पंचायत समिती गणाचे आरक्षण सोडतीचा कार्यक्रम गुरुवारी (दि.28) सकाळी 10.30 वाजता श्री. डॉक्टर नानासाहेब धर्माधिकारी सभागृहात उपजिल्हाधिकारी जे. ए. कासार यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झाला. आरक्षण सोडत तहसीलदार अण्णाप्पा कनशेट्टी यांनी जाहीर केला.

97 महागाव गण अनुसूचित जमाती, खुला, 98 काकडशेत गण, सर्वसाधारण महिला, 99 रहाटाड नागरिकांचा मागास प्रवर्ग खुला, आणि 100 मांदाड गण-सर्वसाधारण महिला असे आरक्षण पडले आहे. चिठ्ठी उचलण्याचे काम प्रगती भौड या छोट्या मुलींनी केले.

महागाव गणात 6 ग्रामपंचायती, 16 गावे असून 7917 लोकसंख्या आहे तर काकडशेत गणात 6 ग्रामपंचायती, 20 गावे व 8529 लोकसंख्या आहे. याशिवाय रहाटाड गणात 6 ग्रामपंचायती, 10 गावे व 8126 लोकसंख्या, मांदाड गणात 7 ग्रामपंचायती, 10 गावे व 966 लोकसंख्या आहे. एकूण 25 ग्रामपंचायती, 56 गावे आणि 33638 लोकसंख्या आहे. अनुसूचित जाती लोकसंख्या 2663 असून अनुसूचित जमाती लोकसंख्या 4343 आहे.

यावेळी तहसीलदार अण्णाप्पा कनशेट्टी, गटविकास अधिकारी कुलदीप बोंगे, नायब तहसीलदार सुरेखा घुगे, नायब तहसीलदार मंगेश पालांडे, मंडळ अधिकारी संजय ठाकर, भूषण पाटील, श्याम राठोड यांचे सह राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष नाना भौड, महाराष्ट्र प्रदेश भाजपा सचिव रविंद्र मुंढे, भारतीय जनता पार्टी अध्यक्ष अँड. निलेश रातवडकर, राष्ट्रीय काँग्रेस अध्यक्ष खेळू वाजे, शेकापक्ष चिटणीस धनराज गायकवाड, लहू चव्हाण, नथुराम अडखळे, कैलास पायगुडे, जनार्दन भौड, युवक अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस नागेश लोखंडे, सचिन कदम, मंगेश भगत, सूर्यकांत सावंत, विठोबा साबळे, नमित पांढरकामे यांचे सह विविध पक्षाचे कार्यकर्ते उपस्थित होते.

Exit mobile version