| मुंबई | प्रतिनिधी |
राज्यातील विशेष सखोल मतदार फेरतपासणी (एसआयआर) मोहिमेत नोटीस बजावण्यात आलेल्या 1 कोटी 22 लाखांहून अधिक मतदारांना मोठा दिलासा मिळाला आहे. आवश्यक कागदपत्रे आणि पुरावे सादर केल्याने तब्बल 99.94 टक्के मतदारांची नावे प्रारूप मतदार यादीत कायम ठेवण्यात येणार आहेत.
निवडणूक आयोगाच्या आकडेवारीनुसार, नोटीस बजावण्यात आलेल्या 1 कोटी 22 लाख 24 हजार 7 मतदारांपैकी 1 कोटी 22 लाख 16 हजार 665 मतदारांनी कागदपत्रांची पूर्तता केली आहे. त्यामुळे त्यांची नावे मतदार यादीत कायम राहण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. एसआयआरची अंतिम मतदार यादी 30 नोव्हेंबर रोजी प्रसिद्ध होणार आहे.
एसआयआरमध्ये सव्वा कोटी मतदारांना दिलासा
