परतीच्या पावसाच्या सरींमुळे शेतकऱ्यांना दिलासा

। चिरनेर । प्रतिनिधी ।

परतीच्या पावसाच्या सरींमुळे उरण तालुक्यातील शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. भाताचे पीक पोटरीला आले असून, भाताच्या पिकांमध्ये दाणा तयार होण्याच्या मार्गावर असताना, परतीच्या पावसाच्या सरी बरसल्यामुळे येथील शेतकरी सुखावला आहे. गणपतीचे आगमन झाल्यापासून पावसाने विश्रांती घेतली होती. मात्र धापडवड जमिनीतील पाण्याचा ओलावा खूप कमी झाल्यामुळे, भात पिकांना दाणे भरण्यासाठी पावसाची निकडीची गरज होती. त्यातच बुधवारी (दि.23) व गुरुवारी (दि.24) पावसाच्या चांगल्या सरी बरसल्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. दरम्यान या विभागातील भात पिकांना अजून पावसाची गरज असल्याचे येथील शेतकऱ्यांनी सांगितले.

Exit mobile version