रणरणत्या उन्हात भाताच्या लोंब्यापासून दाणा अलग; शेतकरी चिंताग्रस्त
। पाताळगंगा । प्रतिनिधी ।
परतीच्या पावसाची भिती आजही आहे. त्यामुळे भात शेती जरी कापण्यायोग्य झाली असली तरी सुद्धा शेतकरी वर्गांनी भात कापणींस मौन धारण केल्याचे पहावयास मिळत आहे. अशातच मनधारणी करुन सुद्धा मजूर मिळत नसल्यामुळे शेतकरी मोठ्या अर्थिक संकटात सापडत चालला आहे.
भात कापणी केली आणि पाऊस पडला तर हाताला दाणा मिळणार नाही. त्याचबरोबर गुरांच्या चाऱ्याचा प्रश्न ऐरणीवर येईल. भाताच्या लोंब्यामध्ये दाणा निर्माण होत असताना, त्याच्या वजनाने भातशेती पडत असल्यांचे दिसत आहे. मात्र असे असले तरी सुद्धा पावसाच्या भीतीने भात कापणी खोळंबळी आहे. यामुळे बळीराजा चांगलाच धास्तावला आहे.
त्यातच अल्प भुधारक शेतकरी वर्गांनी भात कापणींस सुरुवात केली आहे. घरातील सदस्य घेऊन कापणी सुरु केली आहे. भात शेतीत उत्तम पिकही आले आहे. मात्र, परतीच्या पावसाच्या भितीने शेतकरी चिंताग्रस्त झाला आहे.







