। खांब । वार्ताहर ।
रोहा तालुक्यातील धानकान्हे येथील नाथपंथी गोसावी समाजाच्यावतीने रविवारी (दि.26) विविध प्रकारचे धार्मिक कार्यक्रम संपन्न करण्यात आले.
गेल्या अनेक वर्षांची यशस्वी परंपरा राखत संपन्न करण्यात आलेल्या या विविध प्रकारच्या कार्यक्रमांतर्गत कुलस्वामिनी उत्सव अंतर्गत महापूजा, ग्रंथराज ज्ञानेश्वरीचे पारायण, सामुदायिक हरिपाठ, महाप्रसाद व जागर भजन आदी धार्मिक तथा अध्यात्मिक कार्यक्रम संपन्न करण्यात आले. या सर्व कार्यक्रमांसाठी धानकान्हे ग्रामस्थ व महिला मंडळ तसेच तरूण मंडळ त्याचप्रमाणे परिसरातील भाविक भक्तांनी उपस्थिती नोंदवून विविध प्रकारच्या कार्यक्रमांचा लाभ घेतला. तर, या कार्यक्रमासाठी नाथपंथीय गोसावी समाजातील बाहेरगावी असणार्या परिवारातील सदस्यांनी आवर्जून उपस्थिती नोंदवून विविध कार्यक्रमात सक्रिय सहभाग घेतला.