| खांब | प्रतिनिधी |
रोहा तालुक्यातील संभे येथील ज्येष्ठ नागरिकांनी उत्तर भारत धार्मिक सहलीचा आनंद घेतला. किर्तनकार व समाजप्रबोधनकार हभप रायगड भूषण दहिंबेकर महाराज यांच्या प्रमुख उपस्थितीत व पो.पाटील अनंत सानप आणि सामाजिक कार्यकर्ते विलास दहिंबेकर यांच्या मार्गदर्शनाखाली अतिशय नियोजनबद्ध पद्धतीने सहल आयोजित करण्यात आली होती. या धार्मिक सहलीमध्ये संभे गावासह संपूर्ण तालुक्यातून मोठ्या संख्येने भाविक भक्त या सहलीमध्ये सहभागी झाले होते. नियोजनानुमार सर्वप्रथमन पाली बल्लाळेश्वर गणपतीचे दर्शन घेऊन पुढे महड, त्र्यंबकेश्वर, ओंकारेश्वर, उज्जैन, आग्रा, मथुरा, दिल्ली, गोकूळ, हरिद्वार, ऋषीकेश, अयोध्या, काशी, गया, प्रयागराज, चित्रकुट, खजुराहो, रामटेक आणि शेवटी शेगाव येथील गजानन महाराज आणि शिर्डी येथील साईबाबांचे दर्शन घेतले.







