राज्यपालांना हटवा, अन्यथा महाराष्ट्र बंद; उद्धव ठाकरे गरजले

। मुंबई । प्रतिनिधी ।
छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी अनादर करणार्‍या राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांना तात्काळ पदावरुन हटवावे, अन्यथा महाराष्ट्र बंद करु, असा खणखणीत इशारा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिला आहे. याच मुद्यावरुन राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनीही राज्यपालांबाबत केंद्राने तातडीने निर्णय घ्यावा, अशी मागणी केली आहे.सध्या राज्यात राज्यपालांविषयी कमालीचा संताप व्यक्त केला जात आहे. याच मुद्याला अनुसरुन गुरुवारी ठाकरे आणि पवारांनी वेगवेगळ्या पत्रकार परिषद घेत राज्यपाल हटावची मागणी केली.

ठाकरे यांनी ज्यांना वृद्धाश्रमातही जागा नाही, अशांना राज्यपाल म्हणून नेमलं जातं का? हा सुद्धा एक प्रश्‍न केंद्र सरकारला विचारला पाहिजे आणि राज्यपाल नियुक्तीचे निकष सुद्धा ठरवायला पाहिजेत, असं माझं स्पष्ट आणि ठाम मत आहे, असे सुचित केले.आता जर राज्यपालांना हवटलं गेल नाही तर या महाराष्ट्रद्रोह्यांचा विरोध करण्यासाठी आपण एकत्र आलं पाहिजे. सर्वांनी एकत्र येऊन खणखणीत विरोध करुन दाखवलं पाहिजे. असे ते म्हणाले. वेळ आली तर महाराष्ट्र बंद पाडू, शांततापूर्ण मार्गाने महाराष्ट्र बंद करू. महाराष्ट्र हा लेचापेच्यांचा नाही, हे केंद्राला दाखवून देऊ. त्यासाठी महाराष्ट्र बंदमध्ये सर्वांनी सामील व्हावं, असे आवाहनही ठाकरे यांनी केले.

कर्नाटक मुख्यमंत्र्यांवर निशाणा
सीमाप्रश्‍नावरुन ठाकरे यांनी कर्नाटक मुख्यमंत्र्यांवर टीका केली. त्यांच्या अंगात अंगात भूत संचारलं आहे. जणू काही महाराष्ट्रात माणसं राहतंच नाहीत, असा त्यांचा अर्विभाव आहे, असे ते म्हणाले. महाराष्ट्राला अस्मिता, स्वाभिमान, हिम्मत, धमक, शक्ती काहीच नाही, कोणीही यावं आणि टपली मारावी. आम्ही छत्रपती शिवाजी महाराज की जय म्हणून गप्प बसायचं, हे आता खूप झालं,त्यांनाही जशास तसे उत्तर देऊ, असा इशाराही ठाकरे यांनी दिला.

Exit mobile version