छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगणाचे होणार नूतनीकरण

खेळाडूंकडून निःशुल्क ठेवण्याची मागणी

| पनवेल | वार्ताहर |

पनवेल महानगरपालिका हद्दीतील कळंबोली सेक्टर एक येथील भूखंड क्रमांक 20 येथील छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगणाचे नूतनीकरण व विकास करण्यासाठी पनवेल पालिकेने प्रस्ताव मांडला आहे. त्या अनुषंगानेच कळंबोली वॉर्ड 10 चे माजी नगरसेवक विजय खानावकर व या ठिकाणी खेळणाऱ्या खेळाडूंनी स्थानिकांना विचारात घेऊन मैदानाचा विकास करावा, अशी मागणी केली आहे.

पनवेल महानगरपालिका क्षेत्रात समाविष्ट झालेल्या आणि सिडकोने विकसित केलेल्या नोड्समधील विविध सेवांसह उद्याने व खेळाच्या मैदानांचे हस्तांतरण पनवेल महानगरपालिकेकडे करण्यात आले. त्याअनुषंगाने पनवेल पालिकेकडून टेनिस, क्रिकेटची पंढरी असलेले सायन-पनवेल महामार्गावरील कळंबोलीमधील छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगणाच्या नूतनीकरणाबाबत प्रस्ताव मांडला आहे. या ठिकाणी बारमाही क्रिकेट खेळ चालू असतो. पावसाळ्यातही मैदानावर पावसाळी सामने खेळवले जातात. त्यामुळे मैदानाचा विकास करताना क्रिकेट खेळाबद्दल विचार करावा, अशी मागणी विजय खानावकर यांनी केली आहे. तसेच क्रीडांगण सामान्यांसाठी निःशुल्क ठेवावे. क्रीडांगणाच्या सभोवताली कळंबोली गाव, अल्प उत्पन्न गटातील नागरिक व मथाडी कामगार तसेच स्थानिक प्रकल्पग्रस्तांची लोकवस्ती आहे. त्यामुळे सर्वसामान्य मुले खेळापासून वंचित राहू नयेत अशी विनंती माजी नगरसेवक विजय खानावकर यांनी आयुक्त गणेश देशमुख यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

पनवेल महापालिका छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगणाचा विकास व नूतनीकरण करत आहे, ही स्तुत्य बाब आहे, परंतु क्रिकेटचे मैदान शाबुत ठेवून त्या अनुषंगाने मैदानाचा विकास करावा, जेणेकरून येथील अल्प उत्पन्न गटातील व प्रकल्पग्रस्तांची मुले निःशुल्क मैदानी खेळ खेळतील


विजय खानावकर,
माजी नगरसेवक, कळंबोली
Exit mobile version