जयंत पाटील यांच्या आमदार फंडातून दत्तमंदिराचा जीर्णोद्धार

। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।
शेतकरी कामगार पक्षाचे सरचिटणीस आमदार जयंत पाटील यांच्या आमदार फंडातून नागांव वाळंज पारोडा येथे बांधण्यात आलेल्या भव्य व आकर्षक दत्तमंदिराचा जीर्णोद्धार   सरपंच निखिल मयेकर व सदस्या हर्षदा मयेकर यांच्या हस्ते व उद्घाटन  शेकाप महिला आघाडी प्रमुख चित्रलेखा पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.नागावचे माजी सरपंच नंदकुमार मयेकर, सदस्य मंजुषा राणे, श्रीकांत आठवले, व सर्व वाळंज पारोडा ग्रामस्थ यांच्या प्रयत्नातून  हे मंदिर साकारण्यात आले आहे. या जिर्णोद्धारस सोहळयाला सर्व ग्रामपंचायत सदस्य, कर्मचारी,समस्त वाळंज पारोडा व नागांव ग्रामस्थांच्या उपस्थितीत होते. विरेन वैद्य यांनी दत्तमूर्ती व श्री सौरभ राउळ यांनी गणपतीमूर्ती देवळास भेट दिल्या.
श्रीदत्त महाराजांच्या मुर्तीच्या पुजेचा मान निखील मयेकर यांना सपत्नीक दिल्याबद्दल त्यांनी समस्त वाळंज पारोडा ग्रामस्थांना धन्यवाद दिले. तसेच आ. जयंत पाटील व सर्व देणगीदार ज्यांच्यामुळे आपल्या गावात भव्य दत्त मंदिर झाले. अशा सर्वांचे निखील मयेकर यांनी आभार मानले. शेतकरी कामगार पक्षाचे सरचिटणीस आमदार जयंत पाटील यांच्या आमदार फंडातून नागाव येथे (16 लाख) रुपये खर्च करून बांधण्यात आलेल्या दत्त मंदिर व समाज मंदिरास आज आ जयंत पाटील यांनी सदिच्छा भेट दिली. या प्रसंगी त्यांच्या समवेत माजी सरपंच श्री.नंदकुमार मयेकर, विद्यमान सरपंच निखिल मयेकर, सदस्य सौ.मंजुषा राणे, श्री.श्रीकांत आठवले, सौ. हर्षदा मयेकर आणि सर्व वाळंज पारोडा ग्रामस्थ उपस्थित होते.

Exit mobile version