नाना नानी पार्कचे नूतनीकरण

तळा शहराच्या सौंदर्यात भर

| तळा | वार्ताहर |

तळा शहरातील नाना नानी पार्कचे नूतनीकरण करण्यात आले असून पूर्वीपेक्षा आकर्षकरित्या नाना नानी पार्कची सजावट करण्यात आली आहे. त्यामुळे तळा शहराच्या सौंदर्यात आणखीच भर पडली आहे. नगरपंचायत शेजारी 2015 साली उभारण्यात आलेले नाना नानी पार्क हे मध्यवर्ती ठिकाणी असल्याने शहरातील बहुतांश ज्येेष्ठ नागरिकांसाठी निवांत वेळ घालविण्यासाठी हे आधाराचे ठिकाण बनले आहे. तसेच समोरच मारुती व साई बाबांचं मंदिर असल्याने मंदिरात आलेले भाविक व शालेय विद्यार्थी नाना नानी पार्कमध्ये विसावा घेण्यासाठी येत असतात. शहराच्या प्रवेशद्वारावर नगरपंचायतीतर्फे स्वच्छ भारत सुशोभीकरण अंतर्गत सुशोभीकरण करण्यात आले आहे. यामुळे तळा शहरात येणार्‍या नागरिकांसाठी हे सुशोभीकरण आकर्षणाचा केंद्रबिंदु ठरत असून या सुशोभीकरणामुळे तळा शहराच्या सौंदर्यात देखील भर पडली आहे.

Exit mobile version