| अलिबाग | विशेष प्रतिनिधी |
जेएसडब्ल्यू अंतर्गत सीएसआर फंडातून नारंगीचा टेप स्मशाभूमीचे नूतीकरण व बहिरीचा बंगलाबंदर रस्ता टप्पा क्रमांक 2 चे नूतनीकरण, तसेच को.ए.सो माध्यमिक शाळा मानकुले पटागणाचे सुशोभीकरण माजी आमदार पंडित पाटील यांच्या प्रयत्नाने मंजूर झाले.

त्याचे श्रीफळ वाढवताना माजी आमदार पंडित पाटील, ग्रामपंचायतीचे उपसरपंच चेतन ठाकूर सत्याविजय पाटील, सुनील पाटील, सूर्यकांत पाटील, संजय पाटील, संतोष ठाकूर, डॉ.मनोज पाटील, सुभाष पाटील, विक्रम पाटील, जगन्नाथ म्हात्रे, सुनील म्हात्रे, प्रदीप पाटील, रघुनाथ पाटील, मधुकर पाटील आणि ग्रामस्थ ह्यांच्या उपस्थितीत कामाचे शुभारंभ श्रीफळ वाढून करण्यात आले.