जिल्हा परिषद अर्थ विभागाचे नूतनीकरण

। अलिबाग । प्रतिनिधी ।

अलिबाग येथील कुंटेबागमधील रायगड जिल्हा परिषद अर्थ विभागाच्या कार्यालयाचे नूतनीकरण करण्यात आले आहे. मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. भरत बास्टेवाड यांच्या हस्ते या कार्यालयाचे उद्घाटन सोमवारी (दि. 22) रोजी झाले. यावेळी जिल्हा परिषद बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता प्रसन्नजीत राऊत, ग्रामपंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र भालेराव, मुख्य लेखा व वित्त अधिकारी राहूल कदम, उपमुख्य लेखा व वित्त अधिकारी महादेव टेळे, लेखाधिकारी प्रशांत जगताप, सतिश घोळवे, अलिबाग पंचायत समितीचे सहाय्यक गटविकास अधिकारी साळावकर, अर्थ विभागाचे कर्मचारी उपस्थित होते.

जुन्या शेडच्या जागी अर्थ विभागाच्या कार्यालयाचे नूतनीकरण करण्यात आले.या बांधकामासाठी जिल्हा परिषद सेस फंडातून 25 लाख रुपयांचा निधी उपलब्ध करण्यात आला. अर्थ विभागाच्या नवीन कार्यालयात मुख्य लेखा अधिकारी, उपमुख्य लेखाधिकारी, दोन लेखा अधिकारी यांचे कार्यालय असून त्याठिकाणी 12 पर्यवेक्षक व 26 कर्मचार्‍यांचा समावेश आहे. अद्ययावत अशा कार्यालय असून अभ्यागतांसाठी प्रतिक्षालय कक्ष उभारण्यात आले असल्याची माहिती जिल्हा परिषद कार्यालयाकडून देण्यात आली आहे.

Exit mobile version