। पनवेल । वार्ताहर ।
सिंचन प्रकल्पासाठी 45 वर्षांपूर्वी पनवेल तालुक्यात पाटबंधारे विभागाने बांधलेल्या मोर्बे धरणाची गळती थांबण्याची शक्यता निर्माण झाली आहे. पाटबंधारे विभागाकडून धरण दुरुस्तीच्या अंदाजपत्रकाला मंजुरी मिळाली असून अल्पावधीतच निविदा प्रक्रिया पूर्ण होऊन पावसाळ्यापूर्वी धरणाची दुरुस्ती करण्यात येणार आहे.
50 किलोमीटरपेक्षा अधिक भूभागावर व्यापलेल्या मोरबे धरणात 3.22 दशलक्ष घनमीटर पाणी साठविण्याची क्षमता आहे. शेती सिंचन प्रकल्पासाठी बांधण्यात आलेल्या धरणाचे पाणी वापराविना पडून असते, मात्र ते इतर कारणांसाठी कधी वापरात आले नाही. मागील अनेक वर्षांपासून या धरणाला लागलेल्या गळतीमुळे धरणातील पाणी कायमस्वरूपी वाहत असते. प्रशासन काही प्रमाणात डागडुजी केल्यावर लिकेज काही थांबत नव्हते. त्यामुळे मागील वर्षी मोठया प्रमाणावर पाऊस पडल्याने दोन तीन पावसात धरण ओव्हर फ्लॉ झाले होते. मात्र लिकेज असल्याने धरण फूटत का अशी मनात भीती ग्रामस्थ होत होती. कोंडले गाव ग्रामस्थ रवींद्र पाटील 2022 च्या पावसाळ्या अगोदर संपूर्ण धरणचे लिकेज काढले गेले पाहिजे अशी मागणी होती. त्या प्रमाणे मोर्बे धरण काम सुरू करण्यात आले असून ते पावसाळ्या अगोदर पूर्ण व्हावे कोंडले गाव ग्रामस्थ रविंद्र पाटील यांनी प्रशासनकडे केली आहे. कारण पावसाळ्या मध्ये अनेक पर्यटक या धरणावर येत असतात