| आपटा | वार्ताहर |
पाताळगंगा नदीवरील जुना पूल तातडीने दुरूस्त कऱणे आवश्यक आहे. गेले तीन चार वर्ष झाली तरी जुना पूल पाडून दुरूस्ती करा किंवा नवीन बांधा अशी मागणी नागरिक व औद्योगिक क्षेत्रातून होत आहे.
हा पूल आता दुरुस्ती होत नाही व नवीन बांधकामासाठी सार्वजनीक बांधकाम खाते काही हालचाली करीत नाही, यामुळे आता एकाच पूलावर सर्व वाहतूक होते आहे व वाहतूक कोंडी व अपघात होत आहेत. याबाबत सार्वजनीक बांधकाम खाते जुन्या पुलाबाबत काहीच कारवाई करीत नाही. एकतर नवीन पूल केला पाहिजे किंवा जुना पूल पाडून नवीन पूल बांधला पाहिजे. पण या बाबतीत काही हालचाल होत नाही, त्यामुळे एकाच पूलावर दुहेरी वाहतुकीचा भार पडतो. सतत वाहतूक कोंडी व अपघात होतात. तरी या बाबतीत ठोस उपाययोजना करण्यात आली पाहिजे, अशी मागणी या भागातील सर्वजण करीत आहेत.
गेले तीन वर्ष एकाच पुलावर भार पडतो आहे व वाहतूक कोंडी होते आहे. आता लवकरच निर्णय घेतला पाहिजे असे ग्रामस्थ व उद्योग क्षेत्राला वाटते आहे. या बाबतीत सार्वजनिक बांधकाम खाते यांनी ठोस उपाय केले पाहिजे ,असे या भागातील लोकांची मागणी केली आहे.