केळकर विद्यालयात आंतरराष्ट्रीय विमानतळाची प्रतिकृती

| अलिबाग | विशेष प्रतिनिधी |
अलिबाग येथील चिंतामणराव केळकर विद्यालयाने विमान उद्योगाचे महत्व विद्यार्थ्यांना सांगण्यासाठी चिंतामणराव केळकर विद्यालयात आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या प्रतिकृती उभारण्यात आली होती. संजय गावडे यांनी या प्रतिकृतीच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना विमान उद्योगाची माहिती सांगून उद्बोधित केले.

ट्रस्टचे अध्यक्ष अमर वार्डे यांनी नेहमीच विविध उपक्रम विद्यालयात राबविले आहेत. संजय गावडे यांच्या विमान उद्योग या विषयावरील करिअर मार्गदर्शनची तासिका आयोजित केली होती. ही तासिका करिअर गाईडन्सची असलीतरी शाळेतील विद्यार्थ्यांची मात्र आंतरराष्ट्रीय विमानतळाची सहल झाली हे निश्‍चित. विमाने उतरण्याचा आणि उडण्याचा जागतिक रेकॉर्ड करणार्‍या मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर प्रत्यक्ष गेल्याचा अनुभव संजय गावडे यांनी विद्यार्थ्यांना करवून दिला.

विमान उद्योग विषयाबाबत मार्गदर्शन करताना विद्यार्थ्यांना या उद्योगामध्ये कोणते कोणते पर्याय उपलब्ध आहेत. याची माहिती दिली जाते. विद्यार्थ्यांनी केवळ इंजिनिअरिंग होण्याकडे कल न ठेवता रोबोटिक, किबोर्डिंग,एथिकल हैकिंग असे अनेक पर्याय उपलब्ध झाले आहेत. सध्या सोलर सिस्टम,हायड्रोजन पॉवर यावर शोध सुरु आहेत. देशाला सोलर सिस्टीमच यश मिळाले आहे. पुढील पाच वर्षात भारताकडे सोलर प्लेन आणि ऑटो पायलट प्लेन येतील . डोमेस्टिकला ही विमाने सुरु झाली तर प्रवास कमी खर्चात होईल. याची जाणीव संजय गावडे यांनी विद्यार्थ्यांना करून दिली. गेल्या 14 वर्षात संजय गावडे यांनी 150 हुन अधिक शाळांमधून 5 लाखापेक्षा जास्त विद्यार्थ्यांना संजय गावडे यांनी मार्गदर्शन केले आहे.

Exit mobile version