पोलीस अधीक्षक कार्यालयात प्रजासत्ताक दिन साजरा

। अलिबाग । वार्ताहर ।
रायगड जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयात बुधवारी 73 वा प्रजासत्ताक दिन साजरा करण्यात आला. पोलीस अधीक्षक कार्यालय येथे सकाळी 7.40 वा. पोलीस अधीक्षक अशोक दुधे यांच्या हस्ते राष्ट्रीय ध्वजास सलामी देऊन ध्वजारोहणाचा कार्यक्रम पार पडला. ध्वजारोहणानंतर राज्यघटनेच्या उद्देश पत्रिकेचे सामुहिक वाचन करण्यात आले तसेच रायगड जिल्हा पोलीस दलाच्या आस्थापनेवर कठीण व खडतर कामगिरी करणार्‍या पोलीस उपनिरीक्षकधनाजी भरू काळे नेमणूक रसायनी पोलीस ठाणे यांना पुष्पगुच्छ देऊन त्यांचा गुणगौरव करण्यात आला. त्यानंतर मा.पोलीस अधीक्षक सो.यांनी थोडक्यात भाषण करून वाहतुकीचे नियम पाळणे व वैयक्तिक स्वच्छता ते राष्ट्रीय स्वच्छता राखणे बाबत आवाहन केले. यावेळी पोलीस अधीक्षक अशोक दुधे, सो पोलीस अधिकारी/अंमलदार व मंत्रालयीन कर्मचारी हजर होते.

Exit mobile version