‘त्या’ 12 जणांची हेलिकॉप्टरद्वारे सुटका

| नाशिक | वृत्तसंस्था |

नाशिकच्या गिरणा नदीच्या पाण्यात रविवारी मासे पकडायला गेलेले 12 जण अडकल्याची घटना घडली होती. नदीच्या पाणी पातळीत वाढ होत असल्याने या 12 जणांना तब्बल १५ तासांहून अधिक कालावधी उलटूनही अद्याप नदीपात्रातून बाहेर काढता आलेले नाही. आता या 12 जणांना हेलिकॉप्टरद्वारे बाहेर काढण्यात येणार आहे. सर्व जण सुखरूप असल्याची माहिती मिळत आहे.

नाशिकच्या जिल्ह्याचे पालकमंत्री दादा भुसे आमदार मौलाना मुफ्ती मोहम्मद हे परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत. अडकलेल्या तरुणांना जेवण पोहचवण्यात आले आहे. दरम्यान, अशा आपत्कालीन परिस्थितीत आता हेलिकॉप्टरची मदत घेवून 12 जणांना बाहेर काढण्यात येणार असल्याची माहिती मालेगाव महापालिकेचे आयुक्त रवींद्र जाधव यांनी दिली आहे.

Exit mobile version