| नवीन पनवेल | प्रतिनिधी |
पनवेल शहरातील हॉटेल राहुल पार्क लॉजिंग अँड बोर्डिंग वर छापा टाकून पोलिसांनी दोन बांगलादेशी महिलांसह सहा पीडित महिलांची सुटका केली आहे. या प्रकरणी पनवेल शहर पोलीस ठाण्यात चौघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गजानन कदम यांना हॉटेल राहुल पार्क लॉजिंग अँड बोर्डिंग येथे मॅनेजर लॉजमध्ये महिला ठेवून त्यांच्याकडून वेश्या व्यवसाय करून घेतो, अशी माहिती मिळाली होती. त्यानुसार त्या ठिकाणी बनावट ग्राहकाला पाठविण्यात आले. त्याच्या सांकेतिक इशारावरून पोलिसांच्या पथकाने संबंधित लॉजवर छापा टाकला. यावेळी छाप्यामध्ये दोन बांगलादेशी महिलांसहित सहा पिडीत महिला वेश्यागमन करण्यासाठी ठेवलेल्या मिळून आल्या. तसेच, लॉज मॅनेजर गामा नंदू सोनकर, कॅशियर दिपू उमेश यादव, वेटर प्रियांशू रविदास यादव आणि लॉज मालक रमेश शर्मा यांच्या विरोधात पनवेल शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
वेश्या व्यवसायातून महिलांची सुटका
