विद्यमान खासदारांविरोधात खदखद

। रसायनी । वार्ताहर ।

33 मावळ लोकसभा मतदारसंघात दिवसागणिक महाविकास आघाडीचे अधिकृत व लोकप्रिय उमेदवार संजोग वाघेरे पाटील यांना वाढता प्रतिसाद मिळत आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार, भारतीय राष्ट्रीय काँग्रेस, समाजवादी पार्टी, शेतकरी कामगार पक्ष, आम आदमी पार्टी, सीपीआय (एम), आरपीआय (ए), स्वाभिमानी रिपब्लिकन युथ पार्टी, स्वराज इंडिया असे महाविकास आघाडीमधील घटक पक्षांचे नेते खालापूर, पनवेल, उरण आणि कर्जत मतदारसंघ पिंजून काढत आहेत. प्रत्येक ठिकाणी महाविकास आघाडीच्या प्रचारकांचे जागोजागी उत्स्फूर्त स्वागत होत असल्याचे चित्र सर्वत्र दिसत आहे.

वासांबे, चौक, वडगाव, गुळसुंदे आदी विभागात महाविकास आघाडीची तगडी फौज शहरी भागापासून ते अगदी मायक्रो इंटिरियरमध्ये जात संजोग वाघेरे पाटील यांची निशाणी असणारी मशाल घरोघरी पोहोचवत आहेत.

Exit mobile version