नेरळ येथे निवासी बालसंस्कार शिबीर

। नेरळ । प्रतिनिधी ।

कर्जत तालुक्यात गेली 15 वर्षे बालसंस्कार शिबीर राबविणारे कैलाश भोईर यांनी यावर्षी देखील निवासी बालसंस्कार शिबीर आयोजित केले आहे. नेरळ येथील श्री संत ज्ञानोबा तुकोबा वारकरी शिक्षण संस्थेच्यावतीने नेरळ येथील मोहाची वाडी येथील वारकरी शिक्षण संस्थेत बालसंस्कार शिबीर भरवले आहे. 14 मे पासून 1 जून पर्यंत हे बालसंस्कार शिबीर चालविले जाणार आहे. पखवाज वादन, गीता पाठ, कीर्तन, प्राचीन आणि हरिपाठ तसेच संगीताचे प्रशिक्षण देण्याचे शिबीर सुरु केले आहे. याचे प्रशिक्षण देवाची आळंदी येथील निवृत्ती महाराज वाघमारे यांच्याकडून दिले जात आहे. या शिबिरात कर्जत, मुरबाड, खालापूर आणि अंबरनाथ तालुक्यातील 37 बालके सहभागी झाले आहेत. पहाटे पाच वाजल्यापासून या बालकांची दिनचर्या सुरु होत असून रात्री जागर भजनानंतर त्या दिवसाची सांगता होते.

अखंड ज्ञानयज्ञ सोहळा..
बालसंस्कार निवासी शिबिर निमित्त श्री संत ज्ञानोबा तुकोबा वारकरी शिक्षण संस्थेत 26 मे ते 1 जून या कालावधीत अखंड ज्ञानयज्ञ सोहळा आयोजित करण्यात आला आहे.
Exit mobile version