धोकादायक इमारतींमधील रहिवाशांचा जीव टांगणीला

पेण 13ः अतिधोकादायक,29 धोकादायक, पालिकेच्या नोटिशीला केराची टोपली

|पेण | प्रतिनिधी |

पेण शहरात 13 अत्यंत धोकादायक तर 29 धोकादायक अशा एकूण 42 धोकादायक इमारतींना धोकादायक जाहीर करून त्यांना नोटिसा बजावल्या आहेत. मात्र या गोष्टीचा कोणताही गांभीर्य लक्षात न घेता अनेकांनी आपल्या या इमारती, सदनिका किंवा गाळे खाली केले नाहीत. त्यामुळे कठोर निर्णय घेऊन पालिकेच्या माध्यमातून कायदेशीर बाबींनी इमारती खाली करण्याचा निर्णय घेण्यात येणार असल्याचे मुख्याधिकारी जीवन पाटील यांनी सांगितले.

यावर्षी देखील पेण पालिकेने अशा धोकादायक इमारतींच्या किंवा गाळेधारक, सदनिकांच्या मालकांना नोटीस जारी केल्या आहेत. यामध्ये अतिधोकादायक मोनार्च सह. गृह. नि.सं. लि. (उत्कर्ष नगर), कमलाकर मायापाटील (दामगुडे आळी), मे. अवंती सह गृह. नि.स.मर्या (शिवाजी पथ), राजेंद्र शहाणे, माधूरी शहाणे, अनंत शहाणे (बाजारपेठ), प्रियदर्शनी सह.गृह.नि.सं.मर्या चिंचपाडा, वसंत व्हीला सह.गृह. नि.सं. मर्या. शिवाजी पथ, रोहीणी चंद्रकांत झेमसे व इतर 1 झिराळआळी, राम समर्थ सह.गृ.नि.सं., अमृतलाल देविचंद जैन व पोपटलाल देविंचद जैन बारारपेठ, सोनल सह.गृह.नि.सं.लि. चिंचपाडा, मे.चिंतामणी सह.गृह.नि.सं मर्या. खोपोली रोड अदींचा समावेश आहे तर धोकादायक म्हणून प्रभाकर नारायण धारकर गांधी मंदिरा समोर, आनंद दत्तात्रेय जाधव/आनंदी आनंद जाधव लाल बहादूरशास्त्री मार्ग, शालीनी शांताराम विचारे व इतर 3 फणस डोंगरी, मयुरेश दर्शन सह.गृह.नि.सं.मर्या. इस्त्राईल आळी, भरत फूलचंद पुनमिया व अमृत हिम्मतलाल जैन 13 घरांची आळी, गिताई सह.गृह.नि.सं. मर्या. देवनगरी, यशोदाबाई देवजी कडू तरे आळी, नारायण सिना म्हात्रे रामवाडी, सहकारी हौसिंग सोसायटी पूजा नगर, जान्हवी सह.गृहनि.संस्था मर्या. झिराळ आळी, शितल विहार सह.गृह.नि.सं.मर्या. एल.आय.सी कार्यालया जवळ, ओंकार सह.गृह.नि.सं.मर्या. चिंचपाडा, श्रीराम समर्थ सह.गृह.नि.सं.मर्या. चिंचपाडा, सिध्दीविनायक सह.गृह.नि.सं.मर्या. चिंचपाडा, जय गणेश सह.गृह.नि.सं.मर्या. चिंचपाडा, प्राजक्ता सह.गृह.नि.सं.मर्या. चिंचपाडा, स्मिता अपार्टमेंट सह.गृह.नि.सं.मर्या. उत्कर्ष नगर, सत्यम शिवम सुंदरम सह.गृह.नि.सं.मर्या. वडगाव रोड, चिंचपाडा, नारायण निवास सह.गृह.नि.सं.मर्या. दातार आळी, निसर्ग सह.गृह.नि.सं.मर्या. कुंभार आळी, अमित कॉम्प्लेक्स सह.गृह.नि.सं.मर्या. प्रभु आळी, श्रीकृपा सह.गृह.नि.सं.मर्या. चिंचपाडा, श्रीकृपा सह.गृह.नि.सं.मर्या. दातार आळी, परवेज झकेरियॉ शिवाजी पथ, प्रदिप चंद्रकांत शेलार अंतोरा रोड, शिवकमळ सह.गृह.नि.सं.मर्या. नंदिमाळ नाका, नितीन दशरथ वैरागी व इतर 9 चावडी नाका, खोपोली रोड, निवास सह.गृह.नि.स मर्या. चिंचपाडा, नर्मदा हरि सह.गृह.नि.सं.मर्या. रामवडी या इमारतींची नोंद झालेली आहे.

नगरपरिषदेचे नोंदणीकृत स्ट्रक्चरल अभियंता यांनी अहवाल सादर करून प्रमाणित केलेले तसेच शासकीय तंत्रनिकेतन, ठाणे यांच्याकडील थर्ड पार्टी स्ट्रक्चरल ऑडिट नुसार या इमारती धोकादायक आणि अतिधोकादायक घोषित करण्यात आल्या आहेत. त्याप्रमाणे या इमारतींना महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती व औदयोगिक नगरी अधिनियम 1965 चे कलम 195 च्या नोटिसा या इमारती, सदनिका व गाळे धारकांना पालिकेकडून देण्यात आल्या होत्या. परंतु या अत्यंत धोकादायक इमारतीपैकी कोणीही या इमारती खाली न करता आणि त्याचा वापर बंद न करता कोणताही लेखी अहवाल पेण पालिकेला सादर न करता पालिकेच्या या नोटीसिला केराची टोपली दाखवली आहे. त्यामुळे भविष्यात जर दुरदैवी घटना घडल्यास त्याची सर्व स्वी जबाबदारी ही इमारती मालकांची अथवा गाळे मालकांची असणार आहे.

दुर्घटना घडली तर मालक जबाबदार
पेण शहरातील अत्यंत धोकादाय इमारती, घर, सर्व गाळे व सदनिका खाली करून त्यांचा वापर तत्काळ बंद कराव व सदरची इमारत पाडून घेउन तसा लेखी अहवाल पालिकेच्या कार्यालयात सादर करावा अशा प्रकारची नोटीस आम्ही पावसाळयापूर्वीच बजावली होती. मात्र कोणीही तसा लेखी अहवाल सादर केला नसल्याने पावसाळयाच्या पार्श्वभूमीवर आम्ही पुन्हा एकदा नोटीस बजावणार आहोत. तरी देखील या नोटीसिकडे दुर्लक्ष केल्याने जिल्हा स्तरावरून आलेल्या आदेशानुसार पोलिस बंदोबस्त घेउन आम्ही या इमारती खाली करायला लाऊ मात्र तोपर्यत या इमारतींमुळे कोणत्याही प्रकारची जिवीत वा वित्तहानी झाल्यास त्याची जबाबदारी ही इमारत, घर, गाळे किंवा सदनिका धारकांची राहील,असे मुख्याधिकारी जीवन पाटील यांनी जाहीर केले.

गेली तीन-चार वर्ष अतिधोकादायक व धोकादायक इमारतींची यादीमध्ये तीच ती नावे दिसत असून नगरपालिकेकडून फक्त कागदी घोड नाचविले जात आहेत. कारवाई केली जात नाही. त्यामुळे इमातर, घर, गाळे धारक, नगरपालिकांच्या कागदी घोडयांना जुमानत नाहीत आपली मनमानी तशीच चालू ठेवतात. तरी यावेळी सर्व इमारती, घर व गाळेधारकांना खाली करावे .

संतोष पाटील, माजी नगरसेवक
Exit mobile version