मेरी कॉमचा राजीनामा

| नवी दिल्ली | वृत्तसंस्था |

तब्बल सहा वेळा वर्ल्ड चॅम्पियन राहिलेली भारताची बॉक्सर एमसी मेरी कॉमने शुक्रवारी (दि.12) पॅरिस ऑलिम्पिकसाठी भारताच्या अभियानाचे प्रमुख पद सोडले. मेरी कॉमने भारतीय ऑलिम्पिक संघाची अध्यक्ष पीटी उशा यांना पत्र लिहूलन आपण वैयक्तिक कारणामुळे हे पद सोडत असल्याचे सांगितले. पत्रात लिहिले की, मदेशाची कोणत्याही स्वरूपात सेवा करणे ही अभिमानाची बाब असते. मी हे पद स्विकारण्यासाठी मानसिकदृष्ट्या तयार होते. मात्र, मला खेदपूर्वक सांगावे लागत आहे की मी ही जबाबदारी घेऊ शकत नाही. मी वैय्यक्तिक कारणामुळे हे पद सोडत आहे.

Exit mobile version