बाळाराम पाटील यांना मदतीचा हात
। पनवेल । प्रतिनिधी ।
दोन वर्षापूर्वी पनवेल तालुका प्रमुखपदी विश्वास पेटकर यांची नियुक्ती करण्यात आली होती. परंतु, पनवेल मतदार संघातून मविआचे दोन उमेदवार उभे असून पेटकर आणि त्यांच्या कार्यकर्त्यांना पनवेल विधानसभेचे शेकापचे उमेदवार बाळाराम पाटील यांना मदत करायची असल्यामुळे त्यांनी तालुका प्रमुख पदाचा राजीनामा दिला आहे.
शेतकरी कामगार पक्षाने पनवेलमध्ये कृषी उत्पन्न बाजार समिती व पनवेल अर्बन बँकेतील सत्तेत शिवसेनेला सहभागी करुन घेतले आहे. तसेच, मा. आ. बाळाराम पाटील यांनी पनवेल तालुक्यातील शेतकर्यांसाठी, प्रकल्पग्रस्तांसाठी तसेच स्थानिकांसाठी आणि महानगरपालिका क्षेत्रातील नागरिकांसाठी वेगवेगळी जनआंदोलने उभी करून न्याय मिळवून दिला आहे. नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत शिवसेना (उध्दव ठाकरे) पक्षाचे उमेदवार संजोग वाघेरे पाटील यांना निवडून आणण्यासाठी मोठ्या प्रमाणावर त्यांनी प्रयत्न केले होते. याची परतफेड करण्यासाठी व मा.आ. बाळाराम पाटील यांना निवडून आणण्यासाठी शिवसेना (उध्दव ठाकरे) तालुका प्रमुख विश्वास जगन्नाथ पेटकर यांनी पदाचा राजीनामा दिला आहे.