समाजातील कर्तृत्वान व्यक्तींचा सन्मान

। खांब-रोहा । वार्ताहर ।
रोहा तालुक्यातील आरे बुद्रुक ग्रामपंचायत हद्दीतील सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय कामगिरीची दखल घेत समाजातील आदर्श व कर्तृत्वान व्यक्तींचा सत्कार करण्यात आला. कुंभोशी गावचे रहिवासी अनिल मळेकर भारतीय लष्कर सेवेमध्ये भारतीय सैनिक म्हणून तब्बल 22 वर्षांची प्रदीर्घ सेवा पूर्ण करून सेवानिवृत्त झाले. त्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला. ब्रिजेश भादेकर , रविंद्र ठाकूर यांना आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त झाला. समाजातील अशा आदर्श व कर्तृत्वान व्यक्तींचा ग्रामपंचायत आरे बुद्रुकच्या वतीने सत्कार करण्यात आला. याप्रसंगी हीरा ढूमणे, महेश शिंदे, आर. पी. पाटील, प्रशांत शिंदे, दिपक ढूमणे, स्वप्नाली पवार, विद्या डाकी, दिलीप शिंदे, श्रीधर शिंदे, अपेक्षा बोळे, अक्षय दळवी आदी उपस्थित होते.

Exit mobile version