आयुर्वेदिक चिकित्सा शिबीरास प्रतिसाद

। नेरळ । वार्ताहर ।
तिरुपती बालाजी मंडळ भाताण, माजी आ. स्वर्गीय तुकाराम सुर्वे प्रतिष्ठान, कर्जत यांच्या संयुक्त विद्यमाने ज्योविस आयुर्वेद दादर-मुंबई आणि नारी सामाजिक संघटना दादर – मुंबई यांच्या सहकार्याने आयोजित केलेल्या मोफत आयुर्वेदिक चिकित्सा शिबिरात 297 जणांची तपासणी करून त्यांना मोफत औषधे देण्यात आली. याप्रसंगी डॉ. राज सातपुते, डॉ. ज्योती सातपुते, मुकेश सुर्वे, मनीषा सुर्वे, तानाजी पाटील, सुभाष भोईर, बबन मुकादम, अनिल पाटील, महेंद्र गोजे, अशोक भोईर,अनिल भोईर आदी उपस्थित होते.15 डॉक्टरसह नऊ हेल्थ कन्सल्टंट अशा 24 जणांनी 297 जणांची आरोग्य तपासणी केली.

प्रत्येक गावामध्ये कोतवाल, तलाठी हे उपस्थित राहून शेतकर्‍यांना ई-पीक पाहणी करण्यासाठी शेतकर्‍यांच्या शेताच्या बांधावर पोहचले. त्यात तालुक्याचे प्रांत अधिकारी नैराळे, तहसीलदार शीतल रसाळ यांच्यासह मंडळ अधिकारी, नायब तहसीलदार तालुक्यातील गावांना भेटी दिल्या. महसूल विभागाचे अधिकारी कर्मचारी यांच्यासह सर्व ग्रामपंचायत मधील ग्रामसेवक, कृषी विभागाचे कृषी सहायक, तसेच सर्व गावात पोलीस पाटील, स्वस्त धान्य दुकानदार या सर्वांनी तसेच त्या गावातील सर्व शेतकर्‍यांनी ई-पीक पाहणी मोहिमेमध्ये सहभाग घेऊन हि गावातील खरीप पीक पेर्‍याची 100 टक्के ई- पीक पाहणी करण्याचे उद्दिष्ट पूर्ण करण्याचा प्रयत्न महसूल खात्याने केला आहे. या विशेष ई -पीक मोहिमेचा शुभारंभ तालुक्यातील डिकसळ गावात करण्यात आला.

यावेळी मंडळ अधिकारी संतोष जांभळे, विनायक साळुंके, सरिता शेळके, मंजिरी राऊत, तेजस भासे, अमर पाटील, दिपक पाटील, मदन पाटील, गुरुनाथ पाटील, बाळु पाटील, संभाजी भोईर, मारुती पाटील, विश्‍वास गायकर, सूर्याजी कडव, मनोहर भगत, रवींद्र राऊत, किशोर गायकवाड, वासुदेव पाटील, वसंत गायकर आदी उपस्थित होते.

Exit mobile version