| उरण | वार्ताहर |
गोरगरिब जनतेला खासगी हॉस्पीटलमध्य सेवा, उपचाराचे दर परवडत नाही. नाईलाजाने पैसे अभावी अनेक रुग्णांना चांगली सुविधा, सेवा मिळत नाही. तर चांगली सेवा सुविधा मिळाली नसल्याने अनेक रुग्णांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. वेळेत उपचार न मिळाल्यानेही रुग्णांना आपले प्राण गमवावे लागतात ही जनतेची आरोग्याची समस्या लक्षात घेऊन रुपेश पाटील यांनी उरण तालुक्यातील कळंबुसरे गावात प्रधानमंत्री आयुष्यमान भारत योजनेचे शिबीर राबविले.
या शिबीराला जनतेचा, नागरिकांचा उत्तम प्रतिसाद लाभला असून एकूण 150 नागरिकांनी शिबीराचा प्रत्यक्ष लाभ घेतला. याप्रसंगी कुलदिप नाईक, सुनिल केणी, सुदर्शन जाधव, राजेश पाटील, सविता नाईक, मनोहर नाईक, प्रसाद पाटील, विल्सन भोईर, अनंत खारपाटील आदि मान्यवर व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
आयुष्यमान भारत शिबिरास प्रतिसाद
