तंत्रनिकेतन येथे रक्तदान शिबिराला प्रतिसाद

| कोलाड | वार्ताहर |

रोहा तालुक्यातील तटकरे चॅरिटेबलं ट्रस्ट संचालित श्रीमती गीता. द. तटकरे तंत्रनिकेतन,कोलाड गोवे येथे बुधवार दि.04 ऑक्टोबर रोजी रक्तदान शिबीर आयोजित करण्यात आला होता. सदर शिबिराला विद्यार्थ्यांचा उत्तम प्रतिसाद मिळाला. यावेळी ट्रस्टचे विश्वस्त संदीप तटकरे, शासकीय रक्तपेढी अलिबागचे डॉ दीपक गोसावी, प्राचार्य विपुल मसाल, अजित तेलंगे, प्रियंका जामकर, प्राचार्य डॉ विश्वास देशमुख, संजय हजारे, शासकीय रक्तपेढी अलिबाग चे सहकारी,सर्व शाखेचे विभाग प्रमुख,व विद्यार्थी मोठया संख्येने उपस्थित होते. सदर शिबिरात रक्ताच्या 60 पिशव्या रक्त संकलित करण्यात आल्या आहेत. शिबीर यशस्वी करण्यासाठी सर्व विभाग प्रमुख सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी तसेच सिव्हिल विद्यार्थी संघटना यांनी परिश्रम घेतले.

Exit mobile version