। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।
भारतीय स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सव निमित्त बुधवारी (दि.17) रायगड जिल्हा परिषदेत रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. जिल्हा परिषदेच्या सुरबा नाना टिपणीस सभागृहात आयोजित करण्यात आलेल्या रक्तदान शिबिरात 53 जणांनी रक्तदान केले.
जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. किरण पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. अलिबाग शासकीय रक्त केंद्र यांच्या वतीने वैद्यकीय अधिकारी दीपक गोसावी, अधीपरीचारक आकाश सावंत, रक्तकेंद्र वैंज्ञानिक अधिकारी मनिषा नवाळे, प्रयोगशाळा सहाय्यक उमेश पाटील यांनी रक्त संकलनाचे कार्य केले.
या रक्तदान शिबिराला सामान्य प्रशासन विभाग उपमुख्य कार्यकारी अधिकारी निलेश घुले, ग्रामपंचायत विभाग उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र भालेराव यांनी भेट दिली. रक्तदान शिबिर यशस्वी करण्यासाठी जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाने परिश्रम घेतले.