| माणगाव । वार्ताहर ।
माणगावमध्ये महामार्गालगत गांधी मैदान नाणोरे फाटा येथील पेट्रोल पंपाशेजारी भव्य मैदानावर गुरुवार (दि.24) महोत्सवास सुरुवात झाली असुन हा महोत्सव दि. 5 डिसेंबर पर्यंत चालणार आहे. सायंकाळी 5 ते रात्री 10 वाजेपर्यंत दिमाखदार पद्धतीने आकर्षक स्वरूपात करण्यात आले असुन या महोत्सवाला नागरिकांचा उत्सफुर्त प्रतिसाद गेल्या चार दिवसांत लाभला असून विविध खेळांची साधने बरोबरच दुकानांनी महोत्सव सजला आहे. या महोत्सवाचा लाभ नागरिकांनी घ्यावा असे आवाहन आयोजक हितेन शेट छेडा व सहकार्यांनी केले आहे.