घरगुती गणेशोत्सव स्पर्धेला प्रतिसाद

। माथेरान । वार्ताहर ।
माथेरान शिवसेनेच्यावतीने गणेशोत्सव स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. संत रोहिदास नगरमध्ये या स्पर्धेला उत्तम प्रतिसाद लाभला. यामध्ये शंकर तांबे यांनी साकारलेल्या महाभारतातील पौराणिक देखाव्याला प्रथम क्रमांक जाहीर करण्यात आला. द्वितीय क्रमांक संदीप सोनवणे तर तृतीय क्रमांक वैभव पवार यांना जाहीर करण्यात आला. योगेश जाधव व निखिल शिंदे यांनी प्रत्यक्ष जागेवर जाऊन अनेक ठिकाणी गणेश सजावटी बाबतीत सर्वेक्षण व परीक्षण केले.

Exit mobile version