माणगावात नेत्र शिबिरास प्रतिसाद

| माणगाव | वार्ताहर |

माणगावात शंकरा आय हॉस्पिटल नवीन पनवेल व तालुक्यातील विजय चॅरिटेबल ट्रस्ट माणगावतर्फे बुधवार दि.11 रोजी शंकरा आय हॉस्पिटलचे नेत्ररोगतज्ज्ञ डॉ.प्रकाश पाटील व त्यांच्या सहकाऱ्यांनी 86 रुग्णांची नेत्र तपासणी केली. सदरचे शिबीर हे दर महिन्याच्या एका बुधवारी होत असते. या शिबिरात आतापर्यंत 1100 हुन अधिक नेत्ररुग्णांवर यशस्वी मोतीबिंदू शस्त्रक्रिया करण्यात आलेले आहेत. सदर शिबीर पार पाडण्यासाठी विजय मेथा, तनुजा हेमंत मेथा, छाया मेथा, विधिता मेथा, मनीष मेथा, सुप्रिया शिंदे यांच्यासह शंकरा आय हॉस्पिटल नवीन पनवेलचे टीम व्यवस्थापक प्रकाश पाटील, डॉ. केरवी, अश्विनी पाटील, हर्षवी शिंदे, निशा शिंदे, ज्ञानदेव कांबळे, यांनी परिश्रम घेतले.

Exit mobile version