नागोठ्यात नेत्र तपासणीला प्रतिसाद

| नागोठणे | वार्ताहर |

रिलायन्स कंपनीतील कामगार संजय काकडे यांच्या सौजन्याने त्यांचे यांचे दिवंगत वडिल व राजिपच्या आरोग्य खात्यातून सेवानिवृत्त झालेले मधुकर नथ्थू काकडे यांच्या स्मरणार्थ नागोठणे लायन्स क्लब आयोजित व आर झुनझुनवाला संचलित शंकरा आय हॉस्पीटल, नवीन पनवेल यांच्या सहकार्याने नागोठण्यातील शांतीनगर भागात स्व. बाळासाहेब ठाकरे बालोद्यानात संपन्न झालेल्या या मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराला किशोर जैन, सुप्रिया महाडिक, डॉ. राजेंद्र धात्रक, विलास चौलकर, डॉ. मिलिंद धात्रक, सुरेश जैन, ज्ञानेश्वर साळुंखे, सुप्रिया काकडे, प्रकाश जैन, यशवंत चित्रे, डॉ. अनिल गिते, सुधाकर जवके, विवेक करडे, विवेक सुभेकर, अशोक काकडे, सुरेश काकडे, संजय काकडे, सुजाता जवके, दौलत मोदी, विनोद सावंत, दिपक गायकवाड, सुनिल कुथे, शैलेश रावकर, विजय शहासने, मंगेश तेरडे, निर्मला रावकर, किर्तीकुमार कळस, नितीन पत्की आदींसह नागोठणे शहर व परिसरातील नागरिक यावेळी बहुसंख्येने उपस्थित होते. या शिबिरात 61 नागरिकांची नेत्रचिकित्सा करण्यात आली. त्यापैकी मोतीबिंदू आढळलेल्या 24 जणांना शस्त्रक्रिया करण्यासाठी शंकरा आय हॉस्पीटलला नेण्यात आले.

या शिबिराच्या निमित्ताने डॉ. राजेंद्र धात्रक, यशवंत चित्रे, दिपक गायकवाड यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. तर डॉ. अनिल गिते यांनी शिबिरा नंतर डोळ्यांची घ्यावयाची काळजी याविषयी मार्गदर्शन केले. शिबीर यशस्वी करण्यासाठी शंकरा आय हॉस्पीटलचे शिबीर संयोजक प्रकाश पाटील यांच्यासह त्यांची टिम सोनार शर्मा, हर्षवी शिंदे, निशा शिंदे, गुरुनाथ गुटे, ज्ञानेश्वर कांबळे, विश्वनाथ पाटील, आशा सेविका गिता कदम, कामिनी सुर्वे, वैशाली शिर्के, संजना वनकर, प्रज्योती पारंगे आदींनी सहकार्य केले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन विवेक सुभेकर यांनी केले.

Exit mobile version