| नागोठणे । वार्ताहर ।
नागोठणे विभाग काळण समाज आणि तेरणा स्पेशालिटी हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर नेरूळ यांच्या संयुक्त विद्यमाने नागोठणे येथील ग्रामपंचायत शिव गणेश सभागृहात रविवार (दि.16) मोफत आरोग्य शिबिरात पंचक्रोशीतील सुमारे 230 नागरिकांनी सहभागी झाले होते.
या आरोग्य शिबिराचे उद्घाटन नागोठणे सरपंच डॉ. मिलिंद धात्रक व तेरणा स्पेशालिटी हॉस्पिटलचे डॉ.अजित निळे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी नरेंद्र जैन, भाई टके, मंगेश तेरडे, संतोष शहासने, डॉ.अभिजित शहासने, डॉ.प्राजक्ता शहासने, डॉ.अभिजीत शिलाहार, डॉ.आकाश पवार, डॉ.अधिक लोखंडे,दिलीप शहासने, विजय शहासने, प्रकाश तेरडे, प्रकाश झेमसे,निलिमा झेमसे,डॉ शोभा घोडिंदे, विजय चंदने, अरविंद धजेकर, कुलदीप शहासने, प्रकाश चंदने, सुभाष चंदने,अजय चंदने, प्रकाश जैन, यशवंत चित्रे, विवेक सुभेकर, अनिल गीते, दौलत मोदी, प्रतिभा तेरडे, श्रध्दा तेरडे आदींसह विभागातील काळण समाज बांधव उपस्थित होते.
या शिबिरात इ.सी.जी., डायबेटिस तपासणी, रक्त दाब तपासणी,नेत्र तपासणी व अल्पदरात चष्मा, ह्रदय विकार, अन्न नलिका विषयी समस्या, हाडांच्या व मणक्याची समस्या, कॅन्सर, किडनीचे आजार तपासणी आणि कान व नाक तपासणी या सर्व आजारांवर उपस्थित तज्ञ डॉक्टरांकडून तपासणी तसेच डॉक्टराचा मोफत सल्ला आदी वैद्यकीय सेवांचा लाभ घेतला.