खाद्य महोत्सवाला प्रतिसाद

| उरण | प्रतिनिधी |

शिवजन्मोत्सव सोहळा जगदंब ग्रुपतर्फे मोठ्या उत्साहाने साजरा केला. या सणाचे औचित्य साधून महिला बचत गटातर्फे प्रथमच खाद्यपदार्थांचे स्टाँल मांडण्यात आले होते. व्हेज आणि नॉनव्हेज सर्व पदार्थ या स्टॉलमध्ये मांडण्यात आले. पाणीपुरीपासून ते चिकन बिर्याणी पर्यंत सर्व पदार्थ होते. विशेष म्हणजे या बचत गटातील सर्व महिला सहभागी होत्या. या बचत गटात विधंणे ग्रुप ग्रामपंचायतीच्या सरपंच निसर्गा डाकी, अंगणवाडी सेविका आदी महिलांनी सहभाग घेतला. संध्याकाळी सत्रात हा कार्यक्रम असल्याने छोट्या मुलांपासून ते वयोवृद्ध यांनी सर्व पदार्थावर अक्षरक्षः ताव मारला. सर्व ग्रामस्थांनी या खाद्यपदार्थ आणि चवीबाबत कौतुक केले. हे स्टॉल मांडण्यापासून ते शेवटपर्यंत स्वच्छता राखून कार्यक्रम संपन्न केला.

Exit mobile version