। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।
झिराड ग्रामपंचायत, मुंबईमधील ग्रामीण प्रगती फाऊंडेशन, एचसीजी ग्रुप, आणि सीएफटीआय व लायन्स क्लबच्या सहकार्याने झिराडमध्ये नेत्र तपासणीसह कर्करोगपूर्व तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिराला महिलांसह तरुण मंडळी व पुरुषांनी उत्स्फूर्तपणे प्रतिसाद दिला. या शिबिराचा शुभारंभ सीएफटीआयच्या प्रमुख चित्रलेखा पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आला.कोरोनाशी लढा देण्यासाठी झिराड ग्रामपंचायत हद्दीत लसीकरणाची मोहीम राबवून संपूर्ण ग्रामपंचायतीमध्ये शंभर टक्के लसीकरण पूर्ण केले. झिराड व परिसरातील नागरिकांचे आरोग्य चांगले राहावे, डोळ्यांच्या वेगवेगळ्या आजाराचे निदान तातडीने व्हावे यासाठी रायगड जिल्हा परिषद समाजकल्याण सभापती दिलीप भोईर यांच्या पुढाकाराने झिराडमध्ये रविवारी (ता. 24) कर्करोगपूर्व तपासणी व नेत्र तपासणी शिबीर भरविण्यात आले.तंबाखूजन्य पदार्थाच्या सेवनाबरोबरच दारुमुळे कर्करोगसारखे आजार निर्माण होतात. कोकणात तोंडाचा कॅन्सर असलेले रुग्ण मोठ्या प्रमाणात सापडत आहेत. या कॅन्सरमुळे खूप अडचण निर्माण होते. कॅन्सर रुग्णासह त्याच्या कुटुंबात मोठी आर्थिक समस्या निर्माण होते. कॅन्सर होऊ नये यासाठी प्रत्येक नागरिकांनी, महिलांनी, तरुणांनी पुढाकार घेणे गरजेचे आहे. त्यासाठी जनजागृती महत्त्वाची आहे. तंबाखू, दारू पिण्याची सवय नागरिकांना लागू नये यासाठी याठिकाणी वेगवेगळे उपक्रम1111111111111 राबविण्याचा प्रयत्न आहे. हेल्थ केअर ग्रुपच्या माध्यमातून हा प्रयत्न नक्कीच यशस्वी होईल, असा विश्वास आहे.या शिबिराचा शुभारंभ सीएफटीआयच्या चित्रलेखा पाटील, रायगड जिल्हा परिषद समाजकल्याण सभापती दिलीप भोईर, एचसीजी ग्रुपचे डॉ. यश माथीर, ग्रामीण प्रगती फाऊंडेशनचे मुख्य कार्यकारी अधिकारी मंगेश डफले, जिल्हा परिषद सदस्या प्रियदर्शनी पाटील, मोहन हिंदूपूर, अरविंद घरत, शुभदा कुरतडकर, डॉ. मोकल, संतोष गावंड, रवींद्र म्हात्रे, हरेश भोईर, अशोक थळे आदी मान्यवर, पदाधिकारी, झिराड ग्रामपंचायतीचे कर्मचारी, साई क्रीडा मंडळ व साई महिला मंडळाचे सर्व पदाधिकारी, सभासद, ग्रामस्थ व महिला उपस्थित होते. या शिबिरामध्ये महिला वर्गांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला होता. शिबीर यशस्वी करण्यासाठी साई क्रीडा मंडळ, साई महिला मंडळांनी प्रचंड मेहनत घेतली. या कार्यक्रमाचे सूत्रसंचलन संदीप जगे यांनी केले.