| चिरनेर | वार्ताहर |
अयोध्यावरून आलेल्या पवित्र अक्षता कलश यात्रेचे चिरनेर गावात भक्तिमय वातावरणात आगमन झाले आहे. या मिरवणुकीत प्रभू रामचंद्रांची प्रतिमा व अक्षता कलश घेऊन पदयात्रा काढण्यात आली. मिरवणुकीतील टाळ मृदुंगांचा गजरामुळे संपूर्ण गावातील वातावरण राममय झाले होते. यावेळी मोठ्या संख्येने वारकरी, नागरिक, महिलावर्ग व अबाल वृद्ध यात्रेत सहभागी झाले होते. यानिमित्ताने चिरनेरमधीलपाडा येथील श्रीराम मंदिरातून, श्री रामाच्या प्रतिमेचे पूजन करून, हि मिरवणूक गावातील सात पाड्यात हा कलश फिरविण्यात आला. तदनंतर आरती करुन अक्षता मंगल कलश यात्रेचा सांगता समारोप करण्यात आला.
या अक्षता कलश यात्रेत राजेंद्र खारपाटील, भास्कर मोकल, सचिन घबाडी, संजय पाटील, अलंकार परदेशी, सुशांत पाटील, मंगेश खारपाटील, समीर डुंगीकर, अरुण पाटील, रमेश फोफेरकर, प्रतीक गोंधळी, सुरेश पाटील, शुभांगी पाटील, प्रियांका गोंधळी, अविनाश म्हात्रे, किशोर भगत, गणपत खारपाटील बळीराम फोफेरकर, नमस्ते मोकल, अनिल महाराज, दत्तात्रेय महाराज, विश्वास महाराज, गोपाळ महाराज, तसेच गावातील अन्य परिवार या यात्रेत सहभागी झाला होते.







