वनहक्क जागर अभियानास प्रतिसाद

| पेण | वार्ताहर |
आदिवासींचे जल, जंगल व जमिन व जंगलावरील सामुहिक हक्कांबाबत प्रचार व प्रसार करण्यासाठी अंकुर ट्रस्ट मार्फत पेण तालुक्यातील 40 आदिवासी वाड्यांवर वनहक्क जागर हे अभियान राबविण्यात येत आहे. या अभियानात कार्यशाळा, प्रशिक्षण व गाव बैठकांचा समावेश आहे. गावागावातील बैठकांमध्ये आदिवासी कातकरी, ठाकर, धनगर समाजातील वनहक्क धारक आपले प्रश्‍न मांडत असून सामूहिक हक्क दावे भरण्याची प्रक्रिया समजावून घेत आहे.

या अभियानाचा समारोप शनिवाी (24 सप्टेंबर ) चिरनेर जंगल सत्त्याग्रहातील हुतात्मा नाग्या महादू कातकरी यांच्या स्मृतिदिनी होणार आहे. सदर कार्यक्रमास जिल्हाधिकारी महेंद्र कल्याणकर, उपविभागीय अधिकारी व तहसिलदार पेण, प्रकल्प अधिकारी आदिवासी विकास विभाग, पोलीस अधिकारी आदि आवर्जून उपस्थित राहणार असल्याची माहिती जेष्ठ सामाजिक कार्यकर्त्या डॉ. वैशाली पाटील यांनी दिली आहे.

Exit mobile version