अर्थचक्र सुरु राहण्यासाठी निर्बंध शिथिल; राजेश टोपे यांची माहिती

। नाशिक । प्रतिनिधी ।
मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी राज्यातील कोरोना निर्बंध काळजीपूर्वक निर्बंध शिथिल केले आहेत, जीविताचा धोका लक्षात घेऊनच राज्य सरकार पावलं उचलत आहे. अर्थकारण थांबू नये म्हणून परिस्थितीचा अंदाज घेऊन व्यवसाय सुरू करायला परवानगी दिली आहे, असंही नाशिकमध्ये घेतलेल्या पत्रकार परिषदेत आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगीतले.

तसेच लहान मुलांना लस देण्याबद्दल बोलताना, डोस उपलब्ध झाले आहेत, लहान मुलांच्या लस घेण्यासाठी इलिजीबल केलं असेल, तर आम्ही द्यायला तयार आहोत. लहान मुलांच्या लसीकरणास परवानगी द्यावी असी आमची केंद्र सरकारला मागणी असल्याचे टोपे यावेळी म्हणाले.

आरोग्य विभागाच्या रखडलेल्या परीक्षा रीतसर पद्धतीने होतील, पॅनल ऑफ एजन्सी ने सिलेक्शन केलं आहे असे सांगताना न्यासा ही कंपनी ब्लॅक लिस्टेड नाही असे टोपे यांनी स्पष्ट केले. पूर्ण विभागाने दिलेल्या सूचनांच न्यासा देखील पालन करत आहे. या जागा पारदर्शकपणे आणि गुणवत्तेवर घेतल्या जात असून विद्यार्थी हा आमचा केंद्रबिंदू आहे असे सांगताना विद्यार्थ्यांनी एक परीक्षा द्यायची का वेगवेगळ्या परीक्षा द्यायच्या याचा चॉईस विद्यार्थ्यांना असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

सध्या राज्यात टेस्टिंग कमी केलेल्या नाहीत. पॉझिटिव्हीटी दर कमी झालेला आहे . दुसरी लाट फ्लॅट झाली आहे. काही दिवसांपूर्वी कोरोनामुळे मुंबईत एक सुध्दा मृत्यू नाही, हा लसीकरणाचा फायदा आहे.

राजेश टोपे,आरोग्यमंत्री
Exit mobile version