सेवानिवृत्त मदतनीस लता पाटील यांचा सत्कार

। भाकरवड । वार्ताहर ।
भाकरवड अंगणवाडी येथे लता अर्जुन पाटील यांचा सेवानिवृत्तीनिमित्त सत्कार करण्यात आला. अंगणवाडी सेविका वैशाली पाटील, पर्यवेक्षिका सामिया पेरेकर पोयनाड सचिन पाटील, मुख्याध्यापिका प्रतिभा पाटील यांच्या उपस्थितीत हा सत्कार करण्यात आला.

सचिन पाटील यांनी ग्रामपंचायत माध्यमातून कोणत्याही प्रकारची मदत लागल्यास सढळ हस्ते करण्याची ग्वाही दिली. यावेळी 35 हुन अधिक सेविका तर पालक वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Exit mobile version