। गोवे-कोलाड । वार्ताहर ।
रोहा तालुका शासकीय निमशासकीय सेवानिवृत्त संघटनेमार्फत 17 डिसेंबर हा सेवानिवृत्त वेतन दिवस ज्येष्ठ नागरिक सभागृह रोहा येथे उत्साह वातावरणात साजरा करण्यात आला. आयोजित सभेत सेवा निवृत्तांना 7 व्या वेतन आयोगाप्रमाणे निश्चित केलेल्या वेतनच्या फरकाची रक्कम पाच हप्त्यात देण्याचे महाराष्ट्र शासनाने मान्य केले आहे, त्यापैकी तिसर्या हप्त्याची रक्कम मार्च 2022 पर्यंत मिळेल अशी माहिती त्यांनी दिली. तसेच 1972 नंतरचे अनट्रेंड सेवा निवृत्त शिक्षकांना पेन्शन अद्याप दिली जात नाही. ती मिळवून देण्यासाठी संघटने मार्फत शासनाकडे अधिक पाठपुरावा करणेत येत आहे. त्या शिक्षकांना पेंशन मिळवून दिली जाईल अशी ही ग्वाही संघटनेच्या वतीने उपस्थिताना दिली.सदरचा कार्यक्रम साजरा करत असतांना त्या ठिकाणी उपस्थित सभासदांसाठी संघटनेचे अध्यक्ष मारुती राऊत यांचे अध्यक्षतेखाली एक छोटेखानी सभाही घेण्यात आली. सभेला प्रमुख अतिथी म्हणून जिल्हा संघटनेचे उपाध्यक्ष शांताराम गायकवाड , नारायण पाटील, सुरेश मोरे, गावडे गुरुजी, वालेकर अण्णा, बाळाराम शेळके, शैलजा देसाई, संगीता वेदपाठक, संध्या मळेकर, शिल्पा आठवले सहकार्य केले. आभार प्रदर्शन शेखर गुंड यांनी केले.







