सेवानिवृत्त पोलीस शिखर संस्थेला पुरस्कार

| आगरदांडा | प्रतिनिधी |

महाराष्ट्र राज्यातील सेवानिवृत्त पोलिसांसाठी स्थापन करण्यात आलेल्या सेवानिवृत्त पोलिस कल्याणकारी शिखर संस्थेला नुकताच कोल्हापूर येथे रोखठोक मराठी साहित्य संमेलनात आदर्श संस्था पुरस्कार 2024 देऊन गौरविण्यात आले. योगगुरू श्रीकृष्ण देव गिरी यांच्या हस्ते पुरस्काराचे वितरण करण्यात आले. यावेळी शिखर संस्थेच्या वतीने नंदकुमार शेलार, राजेंद्र कासार, राजू सरोदे, अशोक पाटील यांनी पुरस्कार स्वीकारला आहे.

महाराष्ट्रात सेवा निवृत्त पोलिसांच्या संघटना नसल्याने सेवानिवृत्त पोलिसांना अनेक अडचणी सामोरे जावे लागत आहे, याचीच दखल घेऊन पुण्यातील सेवानिवृत्त पोलिस अधिकारी संपतराव जाधव, महादेव पवार व इतर पोलिस बांधवांनी सेवानिवृत्त पोलिस कल्याणकारी शिखर संस्थेची स्थापना केली असून प्रत्येक जिल्ह्यात शिखर संस्था कार्यरत असुन, शिखर संस्थेच्या कार्याची दखल वरीष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी सुध्दा सेवानिवृत्त पोलिसांचे अनेक प्रश्नमार्गी लावले आहेत. लवकरच पंढरपूर येथे शिखर संस्थेच्या वतीने महाअधिवेशन आयोजित करण्यात येणार असल्याचे संस्थेचे अध्यक्ष संपतराव जाधव यांनी सांगितले आहे.

Exit mobile version