सेवानिवृत्त सैनिक हेमंत पिंगळे सत्कार

घोडीवली गावातून काढली मिरवणूक

| खोपोली | प्रतिनिधी |

खालापूर तालुक्यातील घोडीवली गावातील हेमंत दामोदर पिंगळे हे भारतीय सैन्य दलातून सेवानिवृत्त झाल्यानिमित्त घोडीवली ग्रामस्थांनी ढोल ताश्याच्या गजरात मिरवणुक काढत त्यांचा सत्कार करत शुभेच्छा दिल्या.

खालापूर तालुक्यातील घोडीवली गावातील रहिवासी व भारतीय सैन्य दलातील जवान हेमंत पिंगळे नुकतेच 21 वर्षांच्या प्रदीर्घ लष्करी सेवेनंतर निवृत्त झाले. भारतीय सैन्य दलात विविध संकटांना सामोरे जात आपल्या प्राणाची बाजी लावून देशाचे रक्षण करणारे जवान भारतमातेचे भूषण असतात, अशा सैनिकांचा ज्या-त्या गावांना मोठा अभिमान असतो. सेवापूर्ती गौरव सोहळा ग्रामस्थांनी कुटुंबियांसह सपत्नीक सत्कारही केला, यावेळी तेे गहिवरून गेले होते. त्यांनी भारतीय सैन्य दलात 21 वर्षे देशातील जम्मू-काश्मीर, बांगलादेश बॉर्डर, छत्तीसगड अशा विविध ठिकाणी देशसेवा केली. 1 फेब्रुवारी रोजी ते सैन्य दलातून निवृत्त झाले. यावेळी यांनी आपले मत व्यक्त करताना म्हणाले की, घरोघरी विविध सण-उत्सव साजरे होत असतात. मात्र, देशाच्या सीमेवर लढणार्‍या जवानांना कुठलाही सण-उत्सव नसतो. देशाची सुरक्षा करणे हेच एकमेव ध्येय त्यांच्यासमोर असते असे ते म्हणाले.

Exit mobile version