नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण
। पाताळगंगा । वार्ताहर ।
महावितरणच्या गलथान कारभारामुळे अनेक दुर्घटना घडत असतात. याबाबत नागरिकांमधून नाराजी व्यक्त होत असताना खालापूर तालुक्यातील ग्रामीण घोडीवली गावात असणार्या व्यायामशाळेच्या शेजारील ट्रान्सफॉर्मरचा पोल धोकादायक अवस्थेत उभा असून, या पोलमुळे धोका निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे या ट्रान्सफॉर्मरचा पोल बदलावा, अशी मागणी घोडीवली ग्रामस्थ करत असून, याकडे महावितरणाने दुर्लक्ष केल्यास याठिकाणी मोठी दुर्घटना घडू शकते.
घोडीवली गावातील व्यायामशाळेत शेजारी असणार्या ट्रान्सफॉर्मरचा पोल धोकादायक अवस्थेत उभा असल्याने हा पोल केव्हाही पडून याठिकाणी मोठी दुर्घटना घडू शकते, त्यामुळे येथील रहिवासी भीतीच्या सावटाखाली वावरत असताना या पोलची तात्काळ बदलावा अशी मागणी महावितरणकडे करण्यात आली आहे. याबाबत लवकरात लवकर कार्यवाही न केल्यास याठिकाणी मोठी दुर्घटना घडून मोठ्या नुकसानीला येथील ग्रामस्थांना सामोरे जावे लागेल. त्यामुळे तात्काळ याठिकाणी पोल बदलावे, अशी मागणी घोडीवली ग्रामस्थांनी केली आहे, तर पोल न बदलल्यास होणार्या अपघाताला सर्वस्वी महावितरण जबाबदार असेल, असे मत घोडीवली ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे.